breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोथरूडकरांच्या विरोधाला चंद्रकांत पाटीलांनी दिले उत्तर

पुणे | महाईन्यूज |

कोथरूड विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, कोथरूडकरांनी त्यांना विरोध दर्षविला आहे. ‘दुरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरुडचा पाहिजे’, असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. या पोस्टरला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

कोथरूडमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरला आणि विरोधाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिले आहे. ‘मी पुण्याचा, मी महाराष्ट्राचा, मी अवघ्या देशाचा आहे’, असे पाटील यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/ChDadaPatil/videos/376020243351114/?v=376020243351114

चंद्रकांत पाटील यांनी पोस्ट केलेल्या साडेतीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. पुणेकरांचे आणि माझे खूप जुने आणि घनिष्ठ नाते आहे. माझी पत्नी पुण्याची आहे. शिवाय मी पुण्यात विद्यार्थी सेनेत कार्यरत होतो. त्यामुळे मी पुण्याच्या बाहेरचा नाही. मी तुमच्यापैकीच एक आहे, अशी साद देखील पाटील यांनी घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button