‘स्त्री’साठी काहीही अशक्य नाही, याचे उदाहरण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – अरुण चाबुकस्वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/PHOTO-scaled.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबूकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, सामाजिक कार्यकर्ते भगवान गोडांबे, दत्ता बनसोडे, शिवसेना चिंचवड विधानसभा संघटीका अनिता तुतारे, शिल्पा आनपण, श्वेता कापसे, नीता डॉन, कमल गोडांबे, वंदना खंडागळे, माछेन्द्र देशमुख, सुदर्शन देसळ, राजेश गायकवाड तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार म्हणाले की, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंसारख्या महावृक्षाच्या सावलीत सावित्रीबाईंची वाढ खुंटली नाही, उलट अधिक बहरली. स्त्रीने ठरविले तर तिच्यासाठी काहीही अशक्य नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय.
भगवान गोडांबे म्हणाले, सावित्रीबाई धाडसाचा पर्वत होत्या. त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाचे कार्य आपल्या अंतापर्यंत सुरु ठेवले. आयुष्यातील सर्व संकटांना त्यांनी निर्धाराने हरविले आहे. सावित्रीबाईंच्या त्यागाची महिलांनी जाण ठेवावी.
त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी प्रणिता जाधव हिने सूत्रसंचालन केले. रंजिता महातो यांनी पाहुण्यांचे आभार मानले.