breaking-newsपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांचा विरोध डावलून; वाल्हेकरवाडी स्मशानभूमीचे काम सुरु

पिंपरी |महाईन्यूज|

रावेत, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण परिसरात महापालिकेने अद्यावत स्मशानभूमी बांधण्याचे काम हाती घेतले होते. ते काम काही सोसायटीधारक नागरिकांनी बंद केले होते. मात्र बंद पाडण्यात आलेले काम अखेर पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे.

प्राधिकरणाच्या आरक्षित दोन एकर जागेवर शहरातील अद्यावत स्मशानभूमीचे बांधकाम दीड वर्षापूर्वी महापालिकेने सुरु केले होते. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 65 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान परिसरातील हौसिंग सोसायट्यांमधील काही नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध केल्याने सहा महिन्यांपासून हे काम बंद होते.

नागरिकांच्या मागणीप्रमाणे स्मशानभूमी रद्द करून आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा बांधकाम सुरु करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पंधरा दिवसांत हे काम सुरु झाले नाही तर भर चौकात अंत्यसंस्कार करण्याचा इशारा दिला होता.

अखेर ग्रामस्थ आणि सोसायटीधारक यांच्यात सुवर्णमध्य म्हणून स्मशानभूमीचे मुख्य प्रवेशद्वार जे पूर्व दिशेला प्रस्तावित होते ते नदीच्या दिशेला पश्‍चिमेकडे करण्यात आले. त्याशिवाय उंच आणि गर्द झाडी लावून आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे ठरले. त्यानंतर हे बांधकाम पुन्हा सुरु झाले आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button