breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

सेंट ॲन्ड्रयूसन शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्‍याची बेकायदेशीर विक्री

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

अल्पसंख्यांकचा दर्जा प्राप्त असलेल्या काळभोरनगर येथील सॅन्ट अॅन्ड्र्युस शाळेमधील विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे शालेय साहित्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शाळेचे प्राचार्याचा हात असून शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्ती केली जात असल्याने पालकांनी याच्या विरोधात आवाज उठविला आहे.

चिंचवडच्या काळभोरनगर येथील सॅन्‍ट अॅन्‍ड्र्युस शाळेमध्‍ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्‍य सक्‍तीने विक्री करतांना निदर्शनास आले आहे. या शाळेस अल्‍पसंख्‍याक दर्जा प्राप्‍त असल्‍याचे समजते. परंतु, एल.के.जी. वर्गात प्रवेशासाठी लॉटरी पद्धत वापरणे गरजेचे आहे. विद्यार्थांना लॉटरी पद्धतीने प्रवेश देतांना शासनाचा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्‍यक होते, व सदर कामाचे चित्रीकरण करणे देखील आवश्‍यक होते. परंतु, अशी कोणतीही प्रक्रिया न राबविता शाळेचे प्राचार्य हे त्‍यांच्‍या मनमानी पद्धतीने व कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता लॉटरी पद्धतीने मोजक्‍याच विद्यार्थ्‍यांना प्रवेश दिल्‍याचे समजते. उर्वरित विद्यार्थ्‍यांना लॉटरी पद्धतीत नांव न आल्‍याचे सांगुन त्‍यांना प्रवेशापासून वंचित ठेवण्‍यात आले आहे.

वंचित पालकांना समाधानकारकरित्‍या माहिती न देता शाळेतून बाहेर जाण्‍याची सक्‍ती केली जाते. या शाळेने नवीन प्रवेशासाठी दरवर्षी प्रति प्रवेश अर्जासाठी २००/- रुपये रोख स्‍वरुपात आकारले जातात. त्‍याची एकमात्र पावती दिली जात नाही. त्‍यात पालकांचे अतोनात नुकसान होत आहे. अल्‍पसंख्‍याकांचा दर्जा मिळालेल्‍या पिंपरी चिंचवड शहरातील दुस-या शाळा प्रवेश शुल्‍‍क न घेता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवितात. परंतु, सॅन्‍ट अॅन्‍ड्र्युस शाळेतच २००/- रुपये इतक्‍या
रकमेची आकारणी करुन प्रवेश अर्जाची विक्री केली जाते. प्रवेश रद्द केलेल्‍या पालकांचे पैसे परत करणे गरजेचे आहे. तरी, तसे न करता सरळसरळ पैशाचा अपहार व अपव्‍यय या शाळेकडुन केला जात आहे. इतकी जास्‍त रक्‍कम शाळेत जमा होते. तर, या शाळेला अल्‍पसंख्‍यांक दर्जा कसा मिळाला असा प्रश्‍न पालकांकडुन उपस्थित केला जात आहे. पालकांचे पैसे परत मिळवून
देण्‍यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार केली जाणार आहे.

शिक्षण विभागाचे शाळा व्यवस्थापनाला पाठबळ

या शाळेतील प्राचार्य विद्यार्थ्‍यांना सर्रास वह्या, पुस्‍तके रक्‍कम आकारणी करुन विक्री केली जात असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या शाळेमार्फत विद्यार्थ्‍यांना ठराविक दुकानातूनच शालेय गणवेश खरेदी करावे, अशी सक्‍ती केली जात आहे. ही बाब अतिशय गंभीर स्‍वरुपाची असून आतापर्यंत वह्या, पुस्‍तके विक्री करणा-या शाळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. या शाळेवर अद्याप कारवाई न झालेली नाही. प्रशासन या शाळेला पाठीशी घालत आहे काय, अशी शंका पालकांतून व्‍यक्‍त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी देखील सॅन्‍ट अॅन्‍ड्र्युस या शाळेबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्‍याचे समजते. तरी
देखील प्रशासन या शाळेवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

शाळेत वह्या, पुस्‍तके विक्री करणे गैर असून सॅन्‍ट अॅन्‍ड्र्युस शाळेबद्दल कोणत्‍याही पालकांची तक्रार प्रशासन विभागाकडे न आल्‍याने मी कारवाई केलेली नाही. परंतु, तक्रार प्राप्‍त झाल्‍यास किंवा वह्या, पुस्‍तके विक्री केल्‍याचा पुरावा मिळाल्‍यास शाळेवर निश्चितच कायदेशीर कारवाई करु.

विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा

शासनामार्फत कोणत्‍याही शिक्षण संस्‍थेस वह्या, पुस्‍तके विक्री करण्‍याचा परवाना दिलेला नाही. अनाधिकृतपणे शाळेत वह्या, पुस्‍तके विक्री करतांना दिसून आल्‍यास सदर शाळेवर कायदेशीर कारवाई करु.

ज्‍योत्‍सना शिंदे, शिक्षण अधिकारी, पिंपरी‍ चिंचवड म.न.पा.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button