breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुलभा उबाळेंना पोलीस संरक्षण द्या, युवासेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्याशी धक्काबुक्की झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी युवासेनेच्या वतीने केली आहे. यासंदर्भात युवासेनेच्या पदाधिका-यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे.

काल शिवसेना जिल्हा संघटिका यांच्यावर भ्याड हल्ला झाला. विनयभंग केल्याचा प्रकार घडला. सुलभा उबाळे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका, गटनेत्या राहिल्या आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली आहे. काल शिवसेनेच्या एका बैठकीत बाजीराव लांडे यांनी शिवीगाळ केली. त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी युवासेनेच्या पदाधिका-यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

यावेळी नगरसेविका मीनल यादव, शशिकला उभे, आशा भालेकर, वैशाली मराठे, भारती चकवे, नयना पारखे, स्वाती मोरे, युवासेनेचे सचिन सानप, प्रतिक्षा घुले, कुणाल जणगाडे, निलेश हाके, सागर शिंदे, अमित शिंदे, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे, प्रिया जगदाळे, सुधीर कुंभार, किशोर शिंदे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button