सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कमवा व शिका योजनेतील पैशावर माजी विद्यार्थ्यांचा डल्ला
- 3 लाख 46 हजार रुपयांचा अपहार, बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर काढले पैसे
पुणे ( महा ई न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेतील पैशावर माजी विद्यार्थ्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमवा व शिका योजनेत 3 लाख 46 हजार रुपयांचा अपहार झाला आहे.
चौदाशे ते सोळाशे बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने हे पैसे काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे.
यासंदर्भात विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी विद्यापीठाच्या तीन माजी विद्यार्थ्यांच्या विरोधात चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोर भानुदास मगर ( रा. मारवाड, ता. माळशिरस), सागर तानाजी काळे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) आणि किरण गायकवाड (रा.मुढाळे, ता. बारामती) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.