सावित्रीबाई फुलेंचा विचार अंगी जोपासायला हवा – सुरज गायकवाड
![Savitribai needs to cultivate the idea of flowers - Suraj Gaikwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/बसप.jpg)
बहुजन समाज पार्टीतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणात केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी निर्माण केलेल्या विचारांचा वारसा आपण जपणे गरजेचे आहे. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तरुणांची असल्याचे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांनी केले.
पार्टीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. पिंपरी येथिल सावित्रीबाई फुलेंच्या अर्धकृती पुतळ्यास बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी उपाध्यक्ष सुनील चटोले, गौतम गायकवाड, सचिव राजेंद्र पवार, कोषाध्यक्ष धम्मदिप लगाडे, चंद्रकांत सोनवणे, सिद्धार्थ वन्साळी, बसपा जेष्ठ नेते बलराज कटके, बसपा जेष्ठ नेते बाबासाहेब सरोदे, राजन ससाणे, नागेश, विजय शिंदे, तसेच बसपा महिला आघाडीच्या नेत्या विद्या जाधव, शिल्पा गायकवाड, संगीता पवार, बसपाचे मिशनरी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी महापुरुषांच्या घोषणा देऊन महापुरुषांच्या विचारांचा जयजयकार करण्यात आला.