breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावधान… रस्त्यावर थुंकल्यास होणार एक हजार रुपये दंड

महापालिकेच्या स्थायी समितीपुढे आरोग्य विभागाने ठेवला प्रस्ताव

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना संसर्गाचा प्रसार थुंकी व शिंकण्याद्वारे होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, दीडशे रुपये दंड आकारणी केली जात आहे. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने थुंकतांना आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार महापालिका करीत आहे. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या सर्वच प्रकारच्या थुंकीबहाद्दरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. थुंकताना आढळल्यास दीडशे रुपये आणि तोंडाला मास्क नसल्याच पाचशे रुपये दंडाची आकारणी केली जात आहे. दंड भरण्यास नकार देणाऱ्यांवर खटले भरले जात आहेत. गेल्या 23 एप्रिलपासून ही कारवाई सुरू आहे, तरीही अनेक जण मास्क न लावता फिरताना दिसत असून, थुंकणाऱ्यांची संख्याही कमी झालेली नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे.

दरम्यान, शहरात रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांना एक हजार रुपये दंड तर मास्क न वापर केल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यापुर्वी रस्त्यावर थुंकणा-या दीडशे रुपये दंड आकारला जात होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button