breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावधान…! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीवर आता डाॅग-स्काॅडची करडी नजर

प्रायोगिक तत्वावर जलशुध्दीकरण केंद्र आणि दुर्गादेवी उद्यानावर राहणार पाहारा

एक डाॅग व दोन हॅन्डलरवर प्रतिमहा 60 हजार रुपये खर्च 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या महत्वाच्या व अतिमहत्वाच्या मिळकतींवर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी डाॅग स्काॅडची करडी नजर राहणार आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर निगडी प्राधिकरणातील सेक्टर एक व दोन आणि दुर्गादेवी उद्यान, हेगडेवार भवन कचरा वाहतुक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज करण्यास मे. सत्यश्री एंटरप्रायजेस संस्थेला काम देण्यात येणार आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत महत्वाच्या व अतिमहत्वाच्या मिळकतीवर सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरु लागली आहे. अनेक मिळकतीवर सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमणुक करुनही त्याठिकाणी चोरी, अघटीत घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे डाॅग स्काॅड नियुक्त केलेल्या ठिकाणी होणा-या चोरी व अघटीत घटनांवर त्यांचेमार्फत नियंत्रण आणून सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज करण्यात येणार आहे. याकरिता सुरक्षा विभागाकडून प्रायोगिक तत्वावर डाॅग स्काॅडकडून महानगरपालिकेच्या महत्वाच्या मिळकतीवर व अतिमहत्वाच्या मिळकतीवर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. त्या एजन्सीकडून नियुक्त केलेल्या डाॅग स्काॅड ( एक डाॅग व दोन हॅन्डलर) यांचे खर्चापोटी प्रतिमहा 60 हजार खर्च करण्यात येणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेकामी मे. सत्यश्री एंटरप्रायजेस यांचे मार्फत महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र सेक्टर 1 व 2 , दुर्गादेवी उद्यान, हेगडेवार भवन कचरा वाहतूक केंद्र या मिळकतीवर प्रायोगिक तत्वावर डाॅग स्काॅडची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदरील नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी कामकाज व डाॅग स्काॅडकडून सुरक्षा व्यवस्थेकामी होणा-या खर्चास व सदर तरतुद ही ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यास शुक्रवारी होणा-या स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला आहे.

दरम्यान, मे. सत्यश्री एंटरप्रायजेस या खासगी एजन्सीकडून महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून सन 2005 ते 2010 पर्यंत सुरक्षेचे कामकाज केलेले आहे. त्यामुळे महापालिकेच्या महत्वांच्या व अतिमहत्वाच्या मिळकतींना डाॅग स्काॅडचे कामकाज प्रायोगिक तत्वावर देण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button