breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सायन्सपार्क ३० जानेवारीपासून नागरिकांसाठी खुले होणार..!

पिंपरी | प्रतिनिधी

समाजाचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हावा, याकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेले सायन्स पार्क आता लॉकडाऊननंतर दहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर प्रेक्षकांसाठी पुन्हा शनिवारपासून (दि.३०) नियमितपणे खुले होणार आहे. अनलॉक – ५ अंतर्गत सायन्स पार्क खुले करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत, नागरिकांना सायन्सपार्कमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने २३ मार्चपासून देश लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच सायन्स पार्क १५ मार्च २०२० पासून नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले होते. त्यानंतर आर्थिकचक्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात ३० टक्के मनुष्यबळावर तर ऑक्‍टोबर महिन्यात १०० टक्के मनुष्यबळावर उद्योगनगरीतील कंपन्यांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली.

वाचा :-युवासेना विभाग संघटक निलेश हाके यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

दरम्यान, राज्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सायन्स पार्कदेखील नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, सरकारने काही अटींचे बंधन घालत अनलॉक – ५ अंतर्गत जारी केलेल्या सूचनांमध्ये पर्यटन, शैक्षणिक, धार्मिकस्थळे व संग्रहालये सुरु करण्याचे धोरण अवलंबिले आहे. याआधारे या नियम व अटींना अधिन राहत सायन्सपार्क शनिवारपासून पुन्हा नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहे.

विज्ञानाभिमुख समाज घडविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. यामधील प्रदर्शनात विज्ञानावर आधारित प्रयोगांची मांडणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. आता दहा महिन्यांच्या कालावधीनंतर सायन्सपार्कमध्ये पुन्हा विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ वाढणार आहे.

प्रवेशासाठी नियम व अटी

● दहा वर्षांखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाही.

● प्रवेश करताना मास्क घालणे बंधकारक.

● प्रदर्शन पाहताना दोन नागरिकांमध्ये योग्य अंतर असणे आवश्‍यक.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button