breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सफाई कर्मचारी भोगताहेत नरकयातना

आरोग्य विभागातील अधिकारी निष्क्रीय – विधी सभापती मोनाताई कुलकर्णींचा आरोप

पिंपरी ( महा ई न्यूज) – शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुन्या यासह ताप, थंडी, खोकला अशा विविध आजारांचे रुग्ण आढळून येवू लागले असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील साफसफाई, कचरा गोळा करणा-या कर्मचा-यांना पुरेशा सुरक्षा साधना अभावी काम करावे लागत आहे. गेल्या दोन वर्षापासून अनेक कर्मचा-यांना साधने मिळालेली नाहीत. आरोग्य विभागातील निष्क्रीय अधिका-यामुळे सफाई कर्मचा-यांना नरकयातना भोगाव्या लागत असून, संबंधित कर्मचा-यांना तात्काळ साधन सामुग्री उपलब्ध करुन द्या, अशी मागणी विधी सभापती मोनाताई कुलकर्णी यांनी आरोग्य कार्यकारी अधिका-यांकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कचराकुंडीची साफसफाई करताना कर्मचा-यांच्या हातात ग्लोज, पायात गमबूट तसेच तोंडावर मास्क लावलेले दिसत नाही. महापालिकेकडून देण्यात येणारे हॅँडग्लोज निकृष्ट दर्जाचे असल्याने एक दिवस घातल्यानंतर फाटून जातात, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे. अनेकदा सफाई कामगार कचरा उचलताना हातात प्लास्टिकच्या पिशव्या वापरत आहेत. विविध आजारांचा शिरकाव होत असतानाच, पालिका कामगारांना विनासुरक्षा साफसफाई करावी लागत आहे. त्यामुळे याकडे निष्क्रीय पालिका प्रशासन लक्ष देईल का? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

महापालिकेचे आणि ठेकेदारांचे एकूण 4 हजार 813 सफाई कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना किमान दोन वर्षातून एकदा पुरुष व महिलाना गणवेश, प्रतिमहा तोंडाचे मास्क, हॅण्ड ग्लोज, साबण, गम बुट, रेनकोट, स्वेटर देणे बंधनकारक आहे. परंतू, कर्मचा-याना ही साधन सामुग्रीचा अद्याप उपलब्ध झालेली नाही. साफसफाई कर्मचा-यांनी आरोग्य तपासणी वेळेवर होत नाही.  अनेक सफाई कामगार स्वताःचे आरोग्य धोक्‍यात घालून कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. साफसफाई, वाहनचालक आणि कचरा वेचक कंत्राटी कामगारांची संख्या सुमारे 8 हजाराच्या आसपास आहे. तसेच कंत्राटी कामगारांना गणवेश, ओळखपत्र, हॅन्डग्लोज, मास्क, गमबूट अशी साधन सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. त्यानाही काही सुविधा मिळत नाहीत.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागातील आणि ठेकेदारांकडील कंत्राटी कर्मचा-यांना तातडीने सुरक्षा साधने द्यावेत, त्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात यावी, त्यांच्यासह कुटूंबियांनाही उपचार मिळावेत, अशी मागणी विधी सभापती मोनाताई कुलकर्णी यांनी आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे केली आहे.

 

अनेक सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात ?
अनेक सफाई कामगारांना डोळ्यांची जळजळ, डोळे सुजणे, कंबरदुखी, हाडांचा त्रास, धुळीची ऍलर्जी, त्वचाविकार, स्नायूंवरील ताण, दमा व श्वसनाचे आजार अशा विविध आजारांचे सुमारे दोनशेहून अधिक कामगार त्रस्त आहेत, ज्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. पालिका प्रशासनाकडून अशा कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत एकही आरोग्य तपासणी शिबिर महापालिकेने घेतलेले नाही, मग उपचार तर दूरच राहिले.
———————-
महापालिकेच्या साफसफाई कामगारांना वेळेवर सुरक्षा साधने मिळत नसल्याने अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सफाई कर्मचा-यांनी सुरक्षा साधन सामुग्रीसाठी तब्बल पाचशेहून अधिक लोकांनी तक्रारी आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केलेल्या आहेत. तरीही महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यावर कोणताच निर्णय घेत नाहीत, त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्यासाठी आयोगाकडे तक्रार केल्याचे तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button