सातवा वेतन आयोग : कामगार नेते अंबर चिंचवडे यांनी मानले अजित पवारांचे अभार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191225-WA0036.jpg)
- पालिकेतील कार्मचा-यांची झाली दिवाळी
- अवघ्या महिनाभरात निर्णय लावला तडीस
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भाजपच्या तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात सातव्या वेतन आयोगाबाबत निर्णय न झाल्यामुळे कामगारांचा आपेक्षाभंग झाला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करून कामगारांना न्याय मिळवून दिला. यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे नेते अंबर चिंचवडे यांनी पुण्यामध्ये अजित पवार यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यास नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूरी देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला. त्यासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले असून एवढे दिवस हा निर्णय न होण्यामागे भाजपची कर्मचा-यांप्रती असलेली वक्रदृष्टी कारणीभूत होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये एकूण 7 हजार 955 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष वेतन लाभ मिळणार आहे. कर्मचारा-यांच्या वेतनात सरासरी १७ ते २२ टक्के इतकी वाढ होणार आहे. महासंघाचे नेते अंबर चिंचवडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन 11 डिसेंबर रोजी हा विषय त्यांच्यासमोर मांडला होता. त्यावर पवार यांनी चर्चा करत असताना सकारात्मक प्रतिसादही दिला होता. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी अजित पवार शहरात आले होते. पक्षाच्या बैठकीत हा विषय आपण मार्गी लावू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी मला दिला होता. एका आठवड्यात हा ज्वलंत प्रश्न त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. यानिमित्त अजितदादांची पुण्यात भेट घेऊन आभार मानण्यात आल्याचे कामगार नेते अंबर चिंचवडे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे देखील उपस्थित होते. महासंघाचे संभाजी पार्टे, गोरख भालेकर, विजू आठवाल, अविनाश ढमाले, अविनाश तिकोने, निलेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.