breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवी पोलिसांची मोठी कारवाई; 36 लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सामाजिक सुरक्षा पथक व सांगवी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत 36 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

हिंजवडीतील साखरे वस्ती येथे एक जण गुटखा विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार वेषांतर करून दहा दिवस पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. बुधवारी (दि.10) सकाळी सहाच्या सुमारास साखरे वस्ती रोड येथील हुलावळे बेंद्रे वस्ती येथे एका खोलीतून दोन मोटारीतून गुटखा घेऊन जात असल्याचे निदर्शनास येताच पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. 31 लाख 45 हजार 714 रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, बारा लाख 25 हजार रुपये किमतीची वाहने, तेरा हजारांचे दोन मोबाईल, असा एकूण 43 लाख 83 हजार 714 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत श्याम शंकरलाल चौधरी (वय 32), पारसराम चौथाराम मेगवाल (वय 45), ललीत गोविंदराम खारोल (वय 23, तिघेही रा. साखरेवस्ती रोड, हुलावळे बेंद्रे वस्ती, फेज 1, हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, दुसरी कारवाई पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली. विक्रीसाठी आणलेला पाच लाख 25 हजार 25 रुपये किमतीचा गुटखा सांगवी पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईत संजयचंद्र भूषणसिंग ठाकूर (वय 45, रा. ममता सोसायटी, चंदननगर, वडगावशेरी) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. अधिक तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button