breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
सांगवीत तरुणाचा अज्ञाताकडून खून
![Shocking! Five members of a Dalit family were killed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/murder-crime-s_650_010816054428.jpg)
पिंपरी – सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा प्रकार आज (मंगळवारी) पहाटे झाल्याचा संशय पोलीसांनी वर्तविला आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याचे समजले. त्यानुसार सांगवी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या शरीरावर वार केल्याचे आणि डोक्यात दगड मारल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. त्यावरून हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव, त्याची माहिती, खून कोणी व का केला याबाबत तपास सुरू आहे.