breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सल्लागाराचा पालिकेच्या ‘फी’वर डोळा, सर्वाधिक कामासाठी कार्यालयात बसूनच ‘डिझाईन’

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेत सल्लागारांचा ढीग झाला आहे. प्रत्येक कामाला सल्लागार नेमणूक करुन अधिकारी आपली जबाबदारी झटकू लागले आहेत. त्यात सल्लागारांना प्रत्येक कामांच्या पाठीमागे दीड ते दोन टक्के फी मिळत असल्याने सर्वाधिक कामे करण्याचा सपाटा सल्लागारांनी लावला आहे. त्यातच हे महाशय कार्यालयात बसूनच विकास कामाचे स्थळपाहणी न करताच डिझाईन करु लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सल्लागारावर कारवाई करता तो बदलण्याची नामुष्की स्थापत्य विभागावर आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती झालेल्या सभेत ही बाब निर्दशनास आली आहे. यावरुन सल्लागारांनी कार्यालयात बसून विकास कामांचे डिझाईन करु नये. स्थळ पाहणी करून डिझाईन तयार करावे. स्थळ पाहणी करताना महापालिकेच्या कनिष्ठ, उपअभियंत्यांना सोबत घ्यावे. छायाचित्रे, व्हिडीओ शुटिंग काढण्यात यावे अशा सूचना स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

महापालिकेच्या स्थायी समिती सभेतील 30 ऑक्टोबरमधील विषयपत्रिकेवर विकास कामाची स्थळपाहणी न करताच अंदाजपत्रक केलेले सल्लागार मेसर्स आकार अभिनव यांना पॅनेलवरुन काढण्याचा विषय होता. या विषयाला मान्यता देत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मेसर्स आकार अभिनव यांना पॅनेलवरुन काढण्यात आले आहे. मात्र, त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

दरम्यान, महापालिकेतील प्रत्येक कामांना सल्लागार नियुक्त केलेले आहेत. त्या सल्लागार नियुक्तीवेळी झालेल्या अटी-शर्थीचा भंग होताना दिसत आहे. या प्रकारामुळे सर्वच सल्लागारांच्या कामाचे चाैकशी करावी, प्रत्येक सल्लागार कार्यालयात बसून कामांचे डिझाईन करतात का? दहा ठिकाणी साईट व्हिजीट असल्यास महापालिकेच्या कनिष्ठ, उपअभियंत्यांना सोबत घ्यावे. छायाचित्रे, व्हिडिओ शुटिंग काढण्यात यावे. यापुढे ‘साईट व्हिजिट’ न करणा-या सल्लागारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी नगरसेवक राहूल कलाटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button