breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माझा कार्यकाळ ऐतिहासिक आठवण राहिल, असे कार्य करेन – महापौर राहूल जाधव

पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला विश्वास

पिंपरी – जबाबदारीची जाण ठेवून शहराच्या विकासाचे काम करताना तळागाळातील नागरिकांपर्यंत पालिकेच्या कल्याणकारी योजना पोहोचविण्याचे काम करणार आहे. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून कष्टक-यांचे हाल काय असतात याची आपल्याला जाण आहे. सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहिल असे अविस्मरणीय काम करून दाखवेन, असा विश्वास नवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांनी दिला.

 

पिंपरी-चिंचवड शहराचे भाजपचे दुसरे महापौर म्हणून राहुल जाधव यांची आज शनिवारी (दि. 4) निवड झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. आपल्याला जबाबादारीची जाणीव असल्याचे सांगत महापौर जाधव म्हणाले की, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तळागाळातील नागरिकापर्यंत विकास पोहचविणार असून शहराचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार आहे. त्याचबरोबर आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत ज्यांनी सहकार्य केले. त्यांना मानाचा मुजरा करत असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

 

राहूल गुलाब जाधव हे त्यांचे पूर्ण नाव असून त्यांचे शिक्षण इयत्ता दहावी झाले आहे. त्यांनी जाधववाडी, चिखली येथून भाजपच्या तिकिटावर 2017ची महापालिका निवडणूक लढविली आहे. त्यांनी दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना सहकार्य केले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य असताना अनेकांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. 2012 ते 2017 या कार्यकाळात नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागातील सुसज्ज रस्ते, अधुनिक ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा, विद्युत विषयक कामे केली. पदपथावरील विद्युत व्यवस्था केली. नागरिकांच्या सेवेसाठी नागरी सुविधा केंद्र सुरु केले. जलसारथीच्या माध्यमातून मोफत पिण्याचे पाणी दिले. रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. रामायण मैदान, तळई उद्यान, विद्यार्थ्यांचा गौरव, दिव्यांगांना योजनांचा लाभ आदी कामे केली. अशा विविध कामांच्या माध्यमातून समाजातील नागरिकांशी बांधिलकी जपण्याचे कार्य राहूल जाधव यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button