breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सराईत चोरटा युनिट 2 च्या जाळ्यात; सुमारे सव्वापाच लाखांचे दागिने जप्त

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ५ लाख १३ हजार ६४५ रुपये किमतीचे १५५.६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत.

सुनिल मल्हारी तलवारे (वय २८, रा. रेल्वे स्टेशनजवळ, धिरज सातकर यांच्या खोलीत, कान्हे फाटा, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण पाच घरफोडी प्रकरणाचे गुन्हे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणारा एका सराईत चोरटा कान्हे फाटा येथे भाड्याच्या खोलीत परिवारासह राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. यावर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सुनिलला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता तब्बल ५ लाख १३ हजार ६४५ रुपये किमतीचे १५५.६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळुन आले. सुनिलची कसून चौकशी केली असता त्याने वाकड पोलीस ठाणे हद्दीत तीन, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी अशा एकुण पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी लक्ष्मण आढारी, नारायण जाधव, प्रवीण दळे, संजय गवारे, हजरत पठाण, मोहम्मद गौस नदाफ, फारुख मुल्ला, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, तुषार शेटे, नितीन बहिरट, मयूर वाडकर, राहुल खारगे, किरण आरुटे, धर्मराज आवटे, धनराज किरनाळे, चेतन मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button