breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सरकार शरद पवार से डरती है, ईडी को आगे करती है, पिंपरीतून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

भाजपच्या हूकुमशाही प्रवृत्ती जाहीर निषेध, राष्ट्रवादीकडून जोरदार निदर्शने

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

कोण आला रे…. कोण आला, मोदी शहांचा बाप आला. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, एकच साहेब … शरद पवार साहेब, अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा पुतळा जाळत जाहीर निषेध नोंदविला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाय हाय घोषणा देवून राष्ट्रवादीकडून जून्या पुणे मुंबई महामार्गावर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसने पुणे – मुंबई महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला आघाडीच्या वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने, नगरसेवक मयुर कलाटे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, माजी महापाैर वैशाली घोडेकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवतीच्या वर्षा जगताप, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, विद्यार्थी आघाडीचे सुनिल गव्हाणे आदी नगरसेवक, पदाधिकारी, सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, उद्याच्या काळात भाजपाच्या विरोधात कोणीही बोलूच नये, अन्यायाबाबतही बोलू नये, अशा हुकूमशाही भाजपने चालवलेली आहे. तसेच सर्व सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक भयभीत रहावा, हीच खेळी आहे. त्यामुळे या हुकूमशाहीचा आपण लोकशाही मार्गाने विरोध करत असून दि २७ सप्टेंबर २०१९  रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करीत आहोत.

पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील आय-टी, उद्योग, कारखाने, ऑटोमोबाईल सेक्टरच्या उभारणीत शरद पवार साहेबांचे योगदान महाराष्ट्राला माहित आहे. उद्याचा आपला महाराष्ट्र राहण्यासाठी पवार साहेबांचे पन्नास वर्षांचे योगदान विसरणे शक्य नाही. सर्वसामान्यांना सुद्धा अत्याचार व पोलिसांसारख्या यंत्रणांचा दबाव-हुकूमशाही प्रमाणे करत आहे. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, शाळा, व्यापारी, संस्था, उद्योजकांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन  स्वत:च्या हक्कासाठीच्या या बंदमध्ये पाठींबा देवून सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button