breaking-newsपिंपरी / चिंचवड

सरकारने सॅनिटायझर आणि पीपीई किटवरील जीएसटी रद्द करावा – माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या काळात भारत सरकारने कोरोना संबंधित सॅनिटायझर पीपीई किट व इतर संबंधित वस्तूंवरील जीएसटी कर माफ करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरणासारख्या महामारीच्या संकटाला संपूर्ण विश्व सामोरे जात आहे. कोरोना ग्रस्तांची देशामध्ये 3 लाख 89 हजारावर संख्या आहे. कोरोना वैश्‍विक महामारीमुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. कंत्राटी कामगार, शेतकरी, कामगारवर्ग, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य नागरिक, हातावरचे पोट असणारे, रिक्षावाले, दुकानदार, कष्टकरी, मजूर, रोजंदारी करणारे, बांधकाम मजूर, फेरीवाले, फुटपाथ वर व्यवसाय करणारे, सर्व प्रकारचे नोकरदार, किरकोळ विक्रेते या सर्वांची अवस्था लॉकडाऊनमुळे अतिशय बिकट झाली आहे, मध्यमवर्गीयांना हप्ते फेडणे पण मुश्किल झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने विविध उपाययोजना करण्यासाठी नागरिकांना सांगितले आहे. याचाच एक भाग म्हणून सेनीटायझर व पीपीई किट इत्यादीचा वापर नागरिकांना करायला सांगितला आहे. परंतु, यावरही सरकारने जीएसटी आकारला आहे. वरील परिस्थिती पाहता सरकारने हा जीएसटी कर माफ करावा. जेणेकरून सर्वच नागरिकांना सेनिटायझर व पीपीई किट घेणे सुलभ होईल. देशातील कोरोना परिस्थितीवर मात करण्यात याचा उपयोग होईल, प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल, अशी मागणी बाबर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button