समाजाच्या हक्कांसाठी भाजपा ओबीसी मोर्चाची आक्रमक भूमिका!: प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/937993a0-ecac-4058-8d9a-0de6ddad9693.jpg)
– पिंपरी-चिंचवड शहर ओबीसी मोर्चाची जंबो कार्यकारिणी जाहीर
पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चोच्या माध्यमातून आगामी काळात समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेण्यात येईल. जे कार्यकर्ते ‘ओबीसीं’साठी काम करतील अशा कार्यकर्त्यांनाच आगामी महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवर संधी देणार आहे. तसेच, प्रत्येक बुथ स्तरावर ओबीसी संघटनेचे जाळे तयार करण्यात येणार आहे, असे मत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने ओबीसी मोर्चाची जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, कोषाध्यक्ष शैला मोळक, प्रदेश सचिव अमित गोरखे, ओबीसी मोर्चा प्रदेश युवती प्रमुख पुनम राऊत, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विना सोनवलकर, माजी महापौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विजय फुगे, सरचिटणीस राजू दुर्गे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
ओबिसी मोर्चा नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
शहराध्यक्ष – ऋषीकेश (भाऊ) रासकर., सरचिटणीस – नेहूल कुदळे, कैलास सानप, योगेश आकुलकर, अनिल राऊत., उपाध्यक्ष – कांतीलाल भुमकर, शंकर लोंढे, योगेश वाणी, संतोष सुतार, सचिन तळेकर, सुनील लांडगे, सचिन जाधव., चिटणीस – राहुल तळेकर, प्रवीण बनकर, हरिभाऊ तांदळे, अमोल सहावे, जीवन घाटकर, हनुमंत घुगे., प्रसिद्धीप्रमुख – ललीत म्हसेकर., सदस्य – स्वप्नील पाटील.
ओबिसी युवा मोर्चा : अध्यक्ष – राजेश डोंगरे., सरचिटणीस – नितीन साळी, अभिषेक कर्पे, आकाश कळमकर., उपाध्यक्ष – निकेश रवींद्र सोनाळे, संदीप आहेर, सुशांत शेलार, विकास हाडके, सचिन मदने., चिटणीस- नफिस खान, हनुमंत दणाणे., सदस्य – तुषार वाघमारे,
ओबिसी महिला मोर्चा : सरचिटणीस – जयश्री देशमाने, किरण पाचपांडे, सोनाताई गडदे., उपाध्यक्ष – कल्पनाताई गुळवे, लता हिवळेकर, मीना सानप, मनिषा बोराटे, चिटणीस- शुभांगी मोहळकर, नीता गोरे., सदस्य- गीता खंडागळे.