breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समलिंगी मित्राच्या घरी जाणं जीवावर बेतलं

पिंपरीतील दळवीनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून  मृत्यू झाला. प्रदीप मेटे आणि शंकर क्षीरसागर अशी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या दोघांतील शंकर क्षीरसागर हा तृतीयपंथी आहे, त्यांना भेटण्यासाठी प्रदीप मोटे हे रात्री उशिरा आले होते. रात्री प्रदीप शंकर यांना भेटायला आले होते. मात्र, अचानक पहाटे ही भीषण घटना घडली यात प्रदीप आणि शंकर यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

“शंकर क्षीरसागर हा तृतीय पंथी असून, त्यांना भेटण्यासाठी प्रदीप मोटे हे रात्री आले होते. रात्री प्रदीप आला आणि अचानक पहाटे ही भीषण घटना घडली यात प्रदीप आणि शंकर यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शंकर सोबत भाचा,आई,बहीण,दाजी हे सर्व एकत्र घरात राहतात ते या भीषण अपघातातून बचावले आहेत. प्रदीप आणि शंकर यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध होते,” अशी माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.खुळे यांनी दिली आहे.

दळवीनगर झोपडपट्टीतील एका घरात गुरुवारी पहाटे तीन वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. ही आग लगतच्या घरांमध्येही पसरली. या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून आगीत पाच घरं जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button