breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी भिडेच्या अटकेसाठी पुण्यात आंदोलन

अॅट्रोसिटी जनजागरण परिषदेची मागणी 

पिंपरी – भिमा कोरेगाव दंगलीतील संभाजी भिडेला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानूसार अटक करा, भिमा कोरेगाव विजयस्तंभाला राष्ट्रीय स्मारक करा यासह विविध मागण्यासाठी अॅट्रोसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. त्याच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. 

यावेळी राहूल डंबाळे, अश्विन डोके, अजय लोंढे, भारत मिरपगारे, अमोल उबाळे, प्रमोद शिंदे, संगिता शहा, लक्ष्मी शेलार आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करुन दंगल घडवून आणण्यात आली. या संघटनेला सहा महिने लोटले, तरीही दंगलीतील आरोपींना अटक नाही. अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये दंगलीतील संभाजी भिडे यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानूसार अटक करा, तसेच भिमा कोरेगाव चाैकशी आयोगाचे कामकाज सुरु करावे, दंगलीतील जखमी व नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत देवून त्याचे पुर्नवसन करावे यावर तत्काळ निर्णय घेवून नागरिकांना न्याय द्यावी, अशी मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button