breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा 24 जूनला पंढरपुरकडे प्रस्थान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/2Sant_Tukaram_Maharaj_0-1.jpg)
पिंपरी – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज महाराज पालखी सोहळा २४ जून रोजी देहू येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या वतीने सर्व वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी सुरू आहे.
संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे हे ३३४ वे वर्ष असून यावर्षीचा पालखी सोहळा हरित वारी पालखी सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे. पालखी सोहळा २४ जून रोजी प्रस्थान करणार आहे. त्या दिवशी नदीकाठी झाडे लावून पालखी सोहळा पुढे मार्गक्रमण करणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे तीनशे दिंड्या सहभागी होतात. ट्रस्टचे विश्वस्त विशाल मोरे यांनी सांगितले.