breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संतपीठाच्या विषयाला विधी समितीचा ‘हिरवा कंदील’

  • विरोधकांचा विरोध नोंदवून विधी समितीने घेतला निर्णय
  • संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्याचा बाळगला दृष्टीकोण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखली येथे होणा-या संतपीठाच्या समितीवर तज्ञ संचालकांची निवड करण्याच्या ठरावाला विधी समितीच्या बैठकीत विरोधकांनी विरोध केला. मात्र, सांप्रदायीक व अध्यात्मिक अभ्यासक्रमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विरोधकांचा विरोध नोंदवून विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांनी या ठरावाला मंजुरी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा सांप्रदायीक वारसा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चिरंतन टिकण्यासाठी टाळगाव चिखलीत संतपीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ञ समितीची नियुक्त करण्यात येत आहे. या समितीवर आयुक्त श्रावण हार्डीकर यांची पदसिध्द अध्यक्ष तथा संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यासह समितीमध्ये मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे संचालक, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे सचिव तथा संचालक, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे सदस्य, कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर सदस्य, संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे सदस्य, हरी भक्त पारायण राजु ढोरे सदस्य, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे सदस्य, स्वाती मुळे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे.

हा ठराव मंजुरीसाठी आज मंगळवारी (दि. 8) विधी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावर चर्चा होत असताना विरोधकांनी या विषयाला विरोध केला. मात्र, सांप्रदायीक आणि अध्यात्मिक अभ्यासक्रमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा दृष्टीकोण समोर ठेवून विरोधकांचा विरोध नोंदवून या विषयाला विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांनी मान्यता दिली. आता महासभेच्या मंजुरीसाठी या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button