breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 24 जणांना पेन्शन मंजुरी पत्र वाटप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २४ विधवा, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना पेन्शन मंजूरीची पत्रे पिंपरी येथे वाटप करण्यात आली.

आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते ही पत्रे वाटप करण्यात आली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा १४, अपंग ५, वयोवृद्ध ५ अशा एकूण २४ जणांचा पेन्शन मंजूर झालेल्यांमध्ये समावेश आहे.

यावेळी माजी नगरसेवक हिरामण पवार, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष नितीन घोलप, विजय ओव्हाळ, गणेश लंगोटे, महेंद्र सोनवले आदी उपस्थित होते. लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे कार्यालय आकुर्डी येथील तहसील कार्यालयात स्थलांतरीत होणार असल्याची माहिती नितीन घोलप यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button