Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

चिंताजनक! 24 तासांत सापडले 75 हजारहून अधिक रुग्ण, मृतांची आकडेवारी 60 हजारांच्या पार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी भारतात 22 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 69 हजार 878 रुग्णांची नोंद झालेली आहे.

पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार पार झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 25 हजार 99 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 25 लाख 23 हजार 772 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 60 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button