breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘संजयभाऊ… i am sorry’ पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले फलक

होर्डिंग्ज लावून शिवसेनेवर साधला निशाना, महायुतीचे संबंध ताणणा-या राऊतांवर नाराजी

पिंपरी |महाईन्यूज|

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. गेल्या आठ-दहा दिवसात शिवसेेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत भाजप-शिवसेनेचे संबंध ताणले असतानाच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवार चाैकातील स्पाॅट-18 या इमारतीवर ‘संजयभाऊ… i am sorry’ या आशयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रासह होर्डिग्ज झळकले आहेत. यामुळे हे होर्डिंग्ज कुणी आणि कशासाठी लावलेत, हे अद्याप कळू शकले नसले तरीही हे फलक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेनेने महायुतीत निवडणूका लढविल्या. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुका एकत्र लढविल्या. या निवडणुकात जागा वाटपात तडजोड झाली. मात्र, निवडणुकानंतर भाजपने 105 तर शिवसेना 54 जागावर थांबली. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन करताना शिवसेेनेने भाजपला 50-50 चा फाॅर्म्युला ठरल्याची आठवण करुन दिली.

तसेच मुख्यमंत्री पद हे देखील अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन महायुतीचे संबंध चांगले ताणले आहे. तर भाजपशिवाय सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेने हालचाली सुरु केल्या. मात्र, काॅग्रेस-राष्ट्रवादीचा विरोधात बसण्याचा निर्णय आणि भाजपने मुख्यमंत्री पद सोडून मंत्री पदे वाटपाचे धोरणाने सेना एकाकी पडल्याचे दिसत आहे. त्यात भाजपने सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली चालविल्याने संजय राऊत यांनी पंधरा दिवस झाले घेतलेल्या भूमिकेवर पिंपरी-चिंचवडमध्ये फलक झळकले आहेत. यावरुन भाजप-शिवसेनेच्या पदाधिका-यांत अधिकच नाराजी पसरली आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभेतील शिवार चाैकातील स्पाॅट-18 या इमारतीवर ‘संजयभाऊ… i am sorry’ या आशयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे छायाचित्र असलेले होर्डिग्ज झळकले आहे. या सदरील कृत्यामुळे सेना-भाजप कार्यकर्ते व पदाधिका-यांत अधिक संबंध ताणले जावू शकतात.

लोकशाहीत अशा प्रकारे एखाद्याची अवेहलना, उपरोधिक टीका करणे चुकीचे आहे. शिवसेना मित्र पक्ष असून शांततेचा भंग करणा-या सदरील फलक लावणा-या व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करावा, या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button