breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आरती

पिंपरी | प्रतिनिधी

श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरती व पूजन करण्यात आले. श्री संताजी हितवर्धिनी संस्था धानोरे आळंदी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऋषीकेश रासकर यांच्या शुभहस्ते पुजन व आरती करण्यात आली. तेली समाज बांधवांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तेली समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातुन ओबीसी मोर्चा कायम काम करत राहील, असे आश्वासन या वेळी ऋषिकेश रासकर यांनी दिले.

कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुरेशजी गाडगे, विजयराव पांडव, क्रुष्णा चाफले, सुरेश रहाणे, राजेंद्र ढवळे, रविंद्र भागवत, संतोष अडचुले, साहेबराव खेडकर, विजय झंझाट, सुनिल फाटे, मिराताई साखरकर,उषाताई जामोदे, दिनेश गावत्रे  राहुल साखरकर, रामभाऊ अवचार यांसह अनेक तेली बांधव उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button