breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी, दर्शनासाठी भक्तांना प्रवेश बंद

पिंपरी, (महाईन्यूज) – गेली दोन दिवस पावसाने शहरात धुमाकूळ घातला आहे. संततधार सुरू असल्यामुळे परिसरात पावसाच्या बाबतीत समाधानकारक स्थिती आहे. तर, या पावसाने पवना नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. थेरगावचा केजुबाई बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर, चिंचवडच्या श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे.

गतवर्षी याच दिवसांमध्ये पर्जन्यवृष्टी अधिक प्रामाणात झाली होती. यंदा पावसाने सुरूवातीलाच दडी मारसी होती. त्यामुळे नागरिकांत पावसाविषयी चिंता वाढली होती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार सुरूवात झाली आहे. काल शुक्रवारी आणि आज शनिवारी (दि. 28) जोरात पाऊस झाल्याने शहरातील पवना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. थेरगावचा केजुबाई पंधारा पाण्याखाली गेला आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात आणि परिसरात पाणी शिरले आहे.

दोन दिवसांच्या वाढत्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या संपूर्ण भागात पाणीच पाणी झाले आहे. झोडपट्ट्या, नदीपात्रालगतची पत्राशेड पाण्याखाली गेली आहेत. पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील नागरिकांचे सुरक्षीतस्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. निगडी, यमुनानगर, रावेत, भोसरी भागात झाडे उन्मळून पडली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button