श्रीनगर परिसरात विस्कळीत पाणी पुरवठा; शिवशाही व्यापारी संघाचा आंदोलनाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/18424000_412982079088274_6102855670854476383_n.jpg)
पिंपरी – गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभाग क्रमांक 27 मधील श्रीनगर परिसरात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून याला जबाबदार असलेल्या पाणी पुरवठा विभागातील संबंधित अधिका-यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
यासंदर्भात दाखले यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या कायक्षेञात आसलेला ग प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २७ मध्ये श्रीनगर परिसरामधील प्रामुख्याने ज्ञानदिप कॉलनी, आष्टविनायक कॉलनी, सिद्धिवीनायक कॉलनी सहीत संपूर्ण परिसरात अतिशय कमी दाबाने व उशीरा पाणीपुरवठा होऊन लवकर पाणी जात आहे. त्यामुळे तेथील महीलांना खुप ञास सहन करावा लागत आहे.
आयुक्त हार्डीकर यांनी स्वतः लक्ष घालून पाणीपुरवठा प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत. आन्यथा या भागातील रहिवासी महीलांना सोबत शिवसेना स्टाईलने हंडाभर पाणीभरो आंदोलन करण्याचा इशारा दाखले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.