breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत रावेतमध्ये ‘स्कूल’ बस जळून खाक

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

शॉर्टसर्किटमुळे स्कूल बसला आग लागल्याची घटना रावेत येथे शनिवारी (ता 11) सकाळी सातच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. 

रावेत येथील एस.बी. पाटील स्कुलच्या पार्किंगमध्ये (एम एच 14 सी डब्ल्यू 3373) या क्रमांकाची स्कुल बस रात्रीपासून उभी होती. शनिवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे बसला अचानक आग लागली. या  घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या निगडी, प्राधिकरण उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button