breaking-newsपिंपरी / चिंचवड

शुल्कसक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी युवक सेलचे निवेदन : …अन्यथा आंदोलन करणार : विशाल वाकडकर

पिंपरी । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठी पालकांना शालेय शुल्क जमा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.

याबाबत प्राथमिक शिक्षण शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोविड-19 या  कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, व्यवसाय, नोकरी बंद आहेत. परिणामी बंदमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजीविकेची साधने बंद आहेत. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड येथील खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावला जात आहे.

लॉक डाऊननंतर मागील पंधरा वीस दिवसापासून बाजारपेठा व उद्योग हळूहळू सुरू झाले आहेत. नागरिकांना पगार अथवा आर्थिक येणे देणे मिळणे कठीण जात असताना त्यांना पाल्यांचे शालेय शुल्क भरणे जास्तच कठीण जाणार आहे. राज्य सरकारने दिनांक ८ मे २०२० रोजी राज्यभरातील शालेय शुल्क वाढ आणि जमा करण्याची सक्ती न करण्याचा शासन निर्णय काढला आहे.

शासनाच्या आदेशाचे पालन न  करणाऱ्या शाळांवर तात्काळ कठोर व कायदेशीर कार्यवाही करावी, अशी आमची मागणी आहे. यावर कार्यवाही न झाल्यास पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मनमानी शिक्षण संस्था व्यवस्थापनांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारेल, असा इशाराही विशाल वाकडकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button