breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शास्तीकर वगळून मिळकतकर भरा : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘फंडा’

– शास्तीकराबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यावर होईल निर्णय

– कोरोनाच्या संकटात मनपाच्या तिजोरीत महसूल मिळवण्याचा प्रयत्न

पिंपरी । महाईन्यूज  । प्रतिनिधी

गेल्या ७० दिवसांपासून सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड ‘उद्योगनगरी’अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. नागरिकांना रोजगार आणि नोकरी बंद असल्यामुळे कर संकलनही ठप्प झाले आहे. कोरोनाच्या संकटात महापालिका प्रशासनाची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने नवीन ‘फंडा’ लावला आहे. मिळकतधारकांना आता शास्तीकर वगळून मिळकतकर भरता येणार आहे.

          विशेष म्हणजे, शास्तीकर माफीबाबत राज्य सरकारकडे राज्यभरातून मागणी होत आहे. त्याबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत मिळकतधारकांनी  शास्ती न भरता केवळ मूळ मिळकत कर भरावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा आणि प्रशासनाला काहीप्रमाणात महसूल उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकडून मिळकतकर वसुली करताना शास्ती अथवा दंड आकारला जावू नये, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली होती. यावर प्रशासनाचा महसूल वाढावा आणि मिळकतकर वसुली व्हावी. तसेच, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना काहीप्रमाणात का असेना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केले आहे.

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, महापालिका हद्दीतील निवासी/बिगरनिवासी मिळकतधारकांकडून करवसुली केली जाते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व लॉकडाउन घोषित केल्यामुळे नागरिक व उद्योजकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत मिळकतकरापोटी भरणा कमी झाला आहे. मनपा हद्दीतील अनधिकृत बांधकाम करण्याऱ्या मिळकतधारकांना मिळकतकर व शास्तीकर लावलेला आहे. नागरिक मूळ मिळकतकर भरण्यास तयार आहेत. मात्र, करसंकलन कार्यालयाकडून मूळ मिळकतकर व शास्तीकर भरण्यासाठी नागरिकांकडे मागणी केली जात आहे. दोन्ही रक्कम भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. परिणामी, शहरातील मिळकतधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मिळकतकर वसुली होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

शास्तीकर माफीबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा कायम…

पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची शास्तीकरामधून पूर्ण मुक्तता व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत महापालिका प्रशासनाने शास्तीकर आणि दंड वगळून मिळकतकर वसुली करता येईल का? याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शास्तीकराबाबत राज्य सरकारचा आदेश येईपर्यंत मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. यापुढील काळात पूर्ण शास्तीकरमाफीबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button