breaking-newsपिंपरी / चिंचवड
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या आणि रोपांचे वाटप
पिंपरी, (महाईन्यूज – शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना पिंपरी विधानसभेच्या वतीने दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेत 53 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप व पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी 53 रोपांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी दक्षता समिती सदस्य रवि कोवे, प्राचार्य पतंगे, उपप्राचार्य घोडके, पर्यवेक्षक जाधव, एड. अजित बोराडे, सनी कड, राहुल राठोड, रवी नगरकर, ओंकार जगदाळे उपस्थित होते.