Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शिवसेनेकडून पक्ष संघटन बांधणीसाठी रविवारी मुलाखती
![State level liaison campaign by Shiv Sena; Emphasis on appointments](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/shivsena-dhanushyaban.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने शिवसेनेकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवीन युवक, युवती, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या येत्या रविवारी (दि. 28) मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात युवासेना, युवती सेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदांसाठी विधानसभानिहाय, विभागनिहाय व महाविद्यालयनिहाय मुलाखती आकुर्डी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासाठी युवासेना कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी, इच्छुक युवक, युवती, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुलाखतीसाठी रविवार (दि. २८ ऑक्टोबर) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले आहे.