breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना व युवासेना भोसरी विधानसभा आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

भोसरी |

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.सुलभाताई उबाळे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट व शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

खास करून तरुण वर्गाने आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन रक्तदान केलेले आहे. या शिबीरातून जे रक्त संकलन करण्यात आले, ज्याचा वापर गरजू रुग्णांसाठी केला जाणार आहे. या शिबीरात ६०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला आहे. शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने साधुराम मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यांचे उद्घाटन, शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते झाले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, जिल्हा संघटिका सौ सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हा संघटक तुषार सहाणे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, निलेश मुटके, युवा सेना जिल्हा समन्व्यक सचिन सानप, सुरज लांडगे,कुणाल तापकीर, कुणाल जगनाडे, समन्व्यक दादा नारळे, राहुल भोसले, सुखदेव नरळे आबा भोसले, महिला आघाडी भोसरी संघटिका, वेदश्री काळे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, मनीषा परांडे, सुजाता आल्हाट, रुपाली आल्हाट, रावसाहेब थोरात,विभाग प्रमुख योगेश जगताप, काका बोराटे, सतीश दिसलें प्रदिप चव्हाण विश्वनाथ टेमगिरे, नितीन बोन्डे, सतीश मरळ, गणेश इंगवले कृष्णा वाळके,राजू भुजबळ, प्रदिप सपकाळ, अनिल दुराफे, युवा नेते अजिंक्य उबाळे, प्रवीण खिलारे इ. हे उपस्थित होते.

डॉ.डी.वाय.पाटील ब्लड बँक व यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्य यावेळी लाभले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास 8 जेबी पेन ड्राइव्ह देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेते खा शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button