Breaking-newsपिंपरी / चिंचवड
शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांच्या धाडसाचे मातोश्रीवर कौतुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190206-WA0005.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या व शिवसैनिकांवर केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांच्या विरोधात तक्रार देणारे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या कामगारीचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
यावेळी शिवसेना सचिव खासदार आनिल देसाई यांनी दाखले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे, आमोल कोल्हे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, मनोज शिंदे, आशिष वाळके, रविकिरण घटकार, सौरभ शेंडगे, नवनाथ जाधव आदी यावेळी उपस्थित होते.