breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिरुर लोकसभा निवडणूक ; भोसरी गावजत्रा मैदानावर अमोल कोल्हेच्या प्रचारांचा ‘श्रीगणेशा’

  • राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील अभिनेते अमोल कोल्हे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्याचा पक्षातील प्रवेश आगामी शिरुर लोकसभा निवडणुकीत विजयाची नांदी ठरणार असून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून शिरुरमधून ते संभाव्य उमेदवार म्हणून दावेदार मानले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भोसरी गावजत्रा मैदानावर मंगळवारी (दि.5) सायंकाळी 6 वाजता अमोल कोल्हेच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली. तसेच या सभेला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भूजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   

या सभेच्या नियोजनासाठी भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक आज (रविवारी) घेण्यात आली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापाैर मोहिनी लांडे, माजी नगरसेवक पंडीत गवळी यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी,  युवक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेचे पुर्वाश्रमीचे पुणे जिल्हा संर्पक प्रमुख तथा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील सिनेअभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच्या प्रवेशाने शिवसेनेला चांगलाच धक्कातंत्र मानला जात आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून शिरुर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना मैदानात उतरविणार येणार आहे. त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा भोसरीतील गावजत्रा मैदानातून होणार आहे. याकरिता शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी, चाकण, खेड, आंबेगाव, राजगूरुनगर, शिरुर आणि हाडपसर मध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. या बालेकिल्ल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसने भगदाड पाडण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजी आढळराव-पाटील यांच्या विरोधात अमोल कोल्हें यांना राष्ट्रवादीकडून उतरविणार असल्याने आढळराव पाटलांचा शिरुरच्या मैदानात चांगलाच कस लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button