breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण समितीची जोरजबरदस्ती, प्राथमिक, माध्यमिक शाळेचे एकत्रीकरण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे एकत्रीकरण करण्याची शक्कल शिक्षण समिती सदस्यांनी लढविली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव एका सुज्ञ सदस्याने ठेवला आहे. त्याला सभापती मनिषा पवार यांनी सभेत मान्यताही दिली आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शाळा ह्या आरटीई 2009 कायद्यानुसार चालतात. तर, माध्यमिक शाळा एसएस बोर्डाच्या नियमाधीन कार्यरत असतात. या दोन्ही शाळा एकत्रीत चालविण्याचे उदाहरण राज्यात कोठे नाही. ही परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्या निर्मला गायकवाड यांनी दोन्ही विभागातील सर्व माध्यमाच्या एकूण 123 शाळा एकत्रीत चालविण्यासाठीचा प्रस्ताव समितीच्या सभेपुढे आणला. त्याला सभापती मनिषा पवार यांनी सुध्दा कसलाच विचार न करता मंजुरी दिली.

समितीपुढे शिक्षण प्रशासन नतमस्तक

सध्या मनपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. प्रशासनाचे शिक्षकांवर नियंत्रण नाही. सकाळी हजेरी लावून शाळेबाहेर पडलेले शिक्षक शाळा सुटायच्या वेळी परततात. अशी परिस्थिती असताना या शिक्षक यंत्रणेकडून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील 37 हजार 851 विद्यार्थ्यांवर कसे नियंत्रण राहणार, हा खरा प्रश्न आहे. गलेलठ्ठ पगार उचलणा-या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आहे त्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळविण्यास शिकवले तर शिक्षण समितीचा कारभार गतीमान झाला असे म्हणने योग्य ठरेल, अशी भावना पालक वर्गातून व्यक्त होत आहे. शिक्षण प्रशासनही शिक्षण समितीच्या जोरजबरदस्ती कारभारापुढे नतमस्तक होताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button