Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शिक्षक पत्नीला शाळेतच पेटविण्याचा प्रयत्न

पुणे –  घटस्फोटाच्या दाव्यासाठी पत्नी न्यायालयात न आल्याने शिक्षक पत्नीला शाळेतच रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी नर्‍हे येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. याप्रकरणी आशा संतोष चव्हाण (38, रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पती संतोष नामदेव चव्हाण (39) वर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष व आशा यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले असून, आशा या नर्‍हे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. दरम्यान, दोघांतील वादामुळे त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायालयात तारीख होती. परंतु आशा या न्यायालयात आल्या नाहीत. त्याचा राग संतोषला आला होता. शुक्रवारी दुपारी शाळेत आशा त्यांच्या सहकार्‍यांसोबत जेवण करत होत्या. त्यावेळी तेथे संतोष आला. त्याने ‘बाहेर चल मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे म्हणून आशा यांना बाहेर बोलावले.

दोघे जिन्यावर आल्यानंतर संतोषने न्यायालयात तारखेला का आली नाही, असे म्हणत वाद घातला. तसेच पिशवीत बॉटलमध्ये आणलेले रॉकेल बाहेर काढून ‘थांब तुला आता पेटवून संपवींन टाकतो, तुला आज खल्लासच करतो असे म्हणत बाटलीतील रॉकेल अंगावर टाकले. त्यानंतर काडीपेटीची काढी दोन वेळा ओढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादींनी आरडा-ओरडा करत गोंधळ घातल्याने शाळेतील इतर शिक्षक तसेच शिपाई धावत आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तपास सहायक निरीक्षक ज्योती गडकरी करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button