breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शास्तीकर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु – बाळासाहेब थोरात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर सरसकट माफ करावा, ही या नागरिकांची रास्त मागणी आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शहर कॉंग्रेसचे शिष्ठमंडळ मंगळवारी (दि. 11) मुंबईत महसूल मंत्री थोरात यांना भेटले. यावेळी साठे यांनी शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा, अशा मागणीचे पत्र थोरात यांना दिले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश कार्यकारीणी सदस्या निगार बारसकर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर उपाध्यक्ष ॲड. क्षितीज गायकवाड, सज्जी वर्की, सुनिल राऊत, किशोर कळसरकर, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, वकिलप्रसाद गुप्ता आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button