शाळा बुडवून नदीत पोहण्यास आलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/58a368a9-d381-45ec-9d1b-b7ea0784bd37_201807101607.jpg)
पुणे – शाळा बुडवून कामशेत येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्या जवळ पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी (दि.३०) सकाळी दहाच्या सुमार तळेगाव येथील प्रथमेश दिपक साळुंखे ( वय १४ रा. यशवंतनगर , तळेगाव दाभाडे) व त्याचे दोन मित्र हे कामशेत येथिल इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी आले होते. तेव्हा अचानक प्रथमेश पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांच्या ही गोष्ट लक्षात येताच घाबरलेल्या अल्पवयीन मुलांनी आपापली शाळेची दप्तरे उचलून घटनास्थळावरून पळ काढला.
त्यानंतर नदीत एक जण बुडाल्याचा अज्ञात फोन कामशेत पोलिसांना आला. ही माहिती समजताच पोलिसांसह शिवदुर्ग संघटनेच्या २० जणांनी पाण्यात उतरून शोध घेण्यास सुरुवात केली. शनिवरी त्यांना त्यात अपयश आल्यावर रविवार पोलीस हवालदार समिर शेख यांनी रविवारी सकाळी आय एन एस शिवाजी च्या टीमला बोलावले. त्यांनी शोध घेतला असता प्रथमेशचे प्रेत आढळून आले. प्रथमेश तळेगाव नगरपरिषदेच्या संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात शिकत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.