breaking-newsपिंपरी / चिंचवड

शालेय विद्यार्थी महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोविड काळात शालेय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरून घ्यावेत. त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका शेंडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतिने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज जुलै महिन्यात वाटप केले जातात. जुलै उलटून ऑगस्ट सुरू आहे. तरी, अद्याप पालिकेकडून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेतले नाहीत. याबाबत चौकशी केली असता अद्याप अर्ज छापण्यास दिले नसल्याची माहिती कळाली आहे.

सध्या संपूर्ण देशात कोविड 19 चा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे नागरिकांनी मध्यंतरी लॉकडाऊनचा सामना केला आहे. दरम्यान, बहुतांश पालकांच्या नोक-या गेल्या आहेत. आर्थिक हालाकीतून कुटुंबाची वाटचाल सुरू आहे. पालिकेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शिष्यवृत्ती देणे कृमप्राप्त ठरते. मात्र, प्रशासनाने अद्याप शिष्यवृत्ती अर्ज भरून घेतले नाहीत. ही प्रशासनाची मोठी चूक आहे.

तरी, यामध्ये आपण लक्ष घालून शिष्यवृत्ती अर्ज छापून घ्यावेत. विद्यार्थ्यांकडून ते अर्ज भरून घ्यावेत. किंवा ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज भरून घ्यावेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी नगरसेविका शेंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button