शहर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षपदी गंगा धेंडे यांची फेरनिवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/गंगा-धेंडे.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्ष पदी गंगा धेंडे यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हस्ते देण्यात आले.
मुंबईत सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी गंगा धेंडे यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, व सामाजिक न्याय प्रदेश अध्यक्ष जयदेव गायकवाड यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यांच्या निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी शिफारस केली होती.
दरम्यान, गंगा धेंडे यांनी २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुक लढविली होती. काही अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता, त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे धेंडे यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.