breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना दिली बुथनिहाय झालेल्या मतदानाची माहिती

  • मुंबईतील पक्षाच्या बैठकीत माहिती केली सादर
  • माहिती पाहून अजित पवार झाले आवाक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवारांना बुथ निहाय पडलेल्या मतदानाची माहिती पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज रविवारी (दि. 3) मुंबईत दिली.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ न शकलेल्या उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी मुंबई येथील कार्यालयात आज रविवारी (दि. 3) बैठक घेतली. राज्याच्या विविध विधानसभा मतदार संघातून पराभूत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीला पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी देखील हजेरी लावली. त्यांनी पिंपरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार आमदार आण्णा बनसोडे यांना बुथनिहाय पडलेल्या मतदानाची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. त्यानंतर चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे आणि विलास लांडे यांना देखील बुथनिहाय पडलेल्या मतदानाची माहिती वाघेरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button