breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात भर उन्हात पावसाच्या सरी

 पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी) दुपारी साडेपाचच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसाने भर उन्हाळ्यात शहरातील वातावरण काही प्रमाणात थंड झाले.

आज पुणे शहर परिसरात कमाल तापमान 39.8 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. वातावरण पूर्णतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. सकाळपासून उन्हाने कहर केला होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. शरीर थंड करण्यासाठी आईसक्रिम, उसाचा रस, लिंबू सरबत मिळणा-या ठिकाणी नागरिक एकच गर्दी करीत होते. मात्र पाऊस पडल्यानंतर ही गर्दी काहीशी कमी झाली. तुरळक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे शहर परिसरातील वातावरण थोड्या प्रमाणात का होईना थंड झाले आहे.

Pimpri Rain 1

Pimpri Rain 4

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button