breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात नव्याने 25 नागरी सुविधा केंद्र सुरु होणार

तीन प्रभागात एकही अर्ज नाही ; सेवा-सुविधांसाठी नागरिकांचे हेलपाटे वाचणार

पिंपरी – महापालिका हद्दीतील नागरिकांना घराजवळ पालिकेच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हावेत, त्याचे पालिकेतील हेलपाटे कमी व्हावेत, याकरिता महापालिकेने खाजगी तत्वावर नागरी सुविधा केंद्र करण्याचे धोरण तयार केले. तसेच वाढती लोकसंख्या आणि प्रभागाच्या रचनेतील बदलामुळे एका प्रभागात किमान चार नागरी सुविधा केंद्राचे धोरण महापालिकेने आखले आहे. त्यामुळे 33 प्रभागातील 56 ठिकाणे नागरी सुविधा केंद्रासाठी निश्चित करण्यात आली. त्यातील 29 प्रभागात 95 जणांमधून आलेल्या अर्जापैकी 25 जणाचे अर्ज अंतिम पात्र ठरले असून 24,28 आणि 29 या प्रभागातून एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना घराजवळ पालिकेच्या विविध सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता 43 ठिकाणी खाजगी तत्वावर नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित आहेत. सध्या शहराची वाढती लोकसंख्या आणि पालिका हद्द विचारात घेता नवीन प्रभागाच्या रचनेतील बदलामुळे नव्याने नागरी सुविधा केंद्र चालू करणे आवश्यक आहे. त्यानूसार एका प्रभागात तीन ते चार नागरी सुविधा सुरु केले जाणार आहेत. 29 प्रभागात 56 ठिकाणी नागरी सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी जाहिरातीद्वारे नागरिकाकडून अर्ज मागविण्यात आले होते.

नागरी सुविधा केंद्रासाठी 29 प्रभागातून 95 जणांचे पालिकेकडे अर्ज प्राप्त झाले. प्रभाग 24, 28 आणि 29 या तीन प्रभागातून एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तर प्रभाग 11,14,18,19, 20 या मधून आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने 17 अर्जदारामधून लॅाटरी पध्दतीने 10 अर्जदारांची केंद्र चालक म्हणून निवड केलेली आहे. उर्वरीत 3,4,5,7,8,15,16 ,17,21 ,23,27,30 आणि 32 मधून 13 प्रभागासाठी 15 अर्जदारांना नागरी सुविधा केंद्र चालक म्हणून थेट निवड केली आहे. याप्रमाणे एकूण 95 अर्जदारामधून 25 अर्जदार हे अंतिम पात्र ठरले आहेत.

दरम्यान, नागरी सुविधा केंद्र चालकांना महापालिकेच्या सेवासह महाआनलाईन सेवाही नागरिकांना उपलब्ध करणार आहेत. महाआनलाईन सेवांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानूसार केंद्र चालकांना ठराविक रक्कम अदा करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button