breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील 5 कोविड सेंटर होणार बंद, पालिका प्रशासनाचा निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाबाधित रुग्णांचा कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठीचा कल कमी झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेली शहरातील पाच कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावरून कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असे म्हणता येत नसले तरी नागरिक स्वतः काळजी घेत असल्याचे संकेत यावरून येत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या. बाढत्या बाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन महापालिका रुग्णालयावरील वाढता ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने खासगी संस्थांच्या माध्यमातून जागोजागी कोविड सेंटर उभी केली. त्याठिकाणी बाधित रुग्णांना हलवून त्यांना वेळीच योग्य उपचार मिळतील, अशी व्यवस्था केली. त्यामुळेच मृत्यू दर कमी होऊन कोरोनातून मुक्त होणा-या व्यक्तींची संख्या वाढली. मात्र, आज प्रत्येक नागरिकांमध्ये कोरोनाच्या प्रतिकात्मक उपाययोजनांविषयी जागृती झाली आहे. नागरिक स्वतः काळजी घेऊ लागले आहेत. डॉक्टरांनी कोविड संबंधीत लक्षणे आढळल्यास कोणती औषधे घेणे अत्यावश्यक ठरते ती औषधे सांगितली आहेत.

त्यामुळे कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळताच नागरिक स्वतःची आणि घरातील इतर सदस्यांची काळजी घेऊ लागले आहेत. यावरून कोरोनाबाधीत रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. नागरिक काळजी घेऊ लागल्याने महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील असंख्य बेड्स रिकामे रहात आहेत. यामुळे प्रशासनाने संबंधीत कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये डी. वाय. पाटील हॉस्पीटल, म्हाळुंगे येथील म्हाडा याठिकाणी सुरू केलेले कोविड सेंटर, इंदिरा महाविद्यालय याठिकाणचे कोविड सेंटर, चिंचवड येथील ईएसआय याठिकाणचे कोविड सेंटर आणि किवळे येथील सिम्बॉयसिस येथील कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button