breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील विविध विकास कामांसाठी स्थायीकडून सुमारे 74 कोटी रुपयांस मान्यता

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील इंदिरा गाधी रेल्वे उड्डाणपुलाचे केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीट नुसार दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या ८ कोटी ११ लाख रूपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासह शहरात करण्यात येणा-या इतर विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ७३ कोटी ८९ लाख इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

पुणे – आळंदी रस्त्यापासून चऱ्होली लोहगाव हद्दीपर्यंतच्या विकास आराखड्यतील रस्त्यांचे उर्वरित कामे करणेकामी येणाऱ्या ३६ कोटी ३८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.३ वडमुखवाडी गावठाण (सर्व्हे क्र.१२ ) ते चऱ्होली गावठाण (सर्व्हे क्र.४६९ ) पर्यंतचा १८ मी.डी.पी.रस्ता विकसीत करणेकामी येणाऱ्या १ कोटी २५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१० मोरवाडी, म्हाडा येथील संपूर्ण रस्ते स्मार्ट वार्डच्या धर्तीवर अद्यावत पद्धतीने सिमेंट कॉंक्रीटीकरण करणेकामी येणा-या ७ कोटी ९६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्र.क्र १६ मधील मामुर्डी परिसरामध्ये वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणेकामी येणा-या ४३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर घड्याळी तासिका तत्वावर शिक्षक नेमणूकीबाबत येणाऱ्या ५८ लाख ६४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १७ मध्ये विविध कंपन्या व मनपाच्या विविध विभागामार्फत खोदलेले खड्डे चर डांबरीकरणाने दुरूस्ती करणेकामी २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. करिता प्रभाग क्र.१८ मधील मनपा इमारतीची स्ट्रक्चरल ऑडीट मधील अहवालाप्रमाणे दुरूस्ती कामे करणेकामी येणाऱ्या ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ३२ मधील दशक्रिया विधी घाटाचे नुतनीकरण करणेकामी येणाऱ्या ३२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ७ मधील भोसरी सहल केंद्राचे नूतनीकरण करणेकामी येणाऱ्या ५४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ११ अजंठानगर व फुलेनगर परिसरात जल:निसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ३५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ७ परीसरातील स्थापत्य विषयक किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १९ मधील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय अंतर्गत स्थापत्य विभागाच्या मागणी नुसार विद्युत विषयक करणेकामी येणाऱ्या ३८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे – आळंदी रस्त्यापासून चऱ्होली लोहगाव हद्दीपर्यंतच्या विकास आराखड्यतील रस्त्यांचे उर्वरित कामे करणेकामी येणाऱ्या ३६ कोटी ३८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमी मधील दैनदिनी स्वच्छता साफसफाई देखरेख सुरक्षा व उद्यान इ. कामाकरीता ठेकेदार पद्धतीने २४ काळजीवाहक, २४ रखवालदार, ६ माळी असे एकूण ५४ कामगार पुरविणेबाबत येणाऱ्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी, सांगवी येथील मलशुद्धीकरण केंद्राची जलनि:सारण विषयक व इतर अत्यावश्यक कामे करणेकामी येणाऱ्या ४७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १२ ज्योतीबानगर व रूपीनगर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ५८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २५ गणेश भाजी मंडई ते प्रभात कॉलनी दत्त मंदिर रस्त्यावर जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या ४२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २३ थेरगाव येथील कुणाल रेसिडेन्सी ते पवना नदीवरील चिंचवड ब्रिज पर्यंत जलनि:सारण नलिका टाकणेचे काम करणेकामी येणाऱ्या ९९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २३ थेरगाव येथील डीपी. रस्त्यावर स्मशानभूमी ते कुणाल रेसिडेन्सी पर्यंत जलनि:सारण नलिका स्थलांतरित करणेकामी येणाऱ्या ८७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button