breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पिंपरी चिंचवड फेस्टिवल ऑफ द फ्युचर उपक्रम

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

युवा उद्योजकांना व नव्याने उद्योग उभारणा-या पिंपरी चिंचवड शहरातील युवकांना प्रोत्साहन देवून त्यांना उद्योग निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे, त्यांचे कौशल्य वृद्धीत वाढ करणे, शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृड राखणे, सन २०३० पर्यंत पर्यावरण पूरक व राहण्यायोग्य शहर निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहर परिवर्तन कार्यालयामार्फत धोरण तयार केले आहे.

आंतरराष्ट्रीय पिंपरी चिंचवड फेस्टिवल ऑफ द फ्युचर उपक्रम राबविण्यात येणार असून दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२० रोजी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे त्या अंतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नवउद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन व नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.

यामध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अभय जेरे, विशाल गोंडल आदी मान्यवर नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. गोव्यामध्ये जन्मलेले डॉ. रघुनाथ माशेलकर हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ व रासायनिक अभियंते आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, २००४ ते २००६ या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय अकादमीचे अध्यक्ष, २००७ साली रासायनिक अभियांत्रिकी संस्थेचे अध्यक्ष, २००७ ते २०१८ या काळात ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. २०११ साली स्थापन झालेल्या अकॅडमी ऑफ सायंटीफिक अॅंड इनोव्हेटीव्ह रिसर्च चे पहिले अध्यक्ष होते. भारत सरकारने त्यांना पद्माविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे.

डॉ. अभय जेरे यांना गेल्यावर्षी एमएचआरडीचे पहिले सीआयओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अलीकडच्या काही वर्षात डॉ. जेरे यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ची मांडली आहे. पंधरापेक्षा जास्त संस्थामध्ये इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना केली. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी नॅशनल इनोव्हेशन आणि स्टार्टअप धोरण २०१९ ची संकल्पना मांडली आणि अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑंन इनोव्हेशन अचिव्हमेंट या संकल्पनेला कार्यान्वित केले आहे. हॅकेथॉन, इतर देशांबरोबरचे संबंध आणि नाविन्य केंद्रित एमबीए प्रोग्रॅम यासारख्या उपक्रमांद्वारे डॉ. अभय जेरे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला चालना देण्याचे काम करीत आहेत.

विशाल गोंडल हे एक भारतीय उद्योजक व स्टार्टअप कंपन्यांना भांडवल पुरवणारे गुंतवणूकदार म्हणून परिचयाचे आहेत. GOQ11 या फिटनेस ब्रॅंडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले विशाल गोंडल याआधी व्हिडिओ गेम बनवणा-या आणि प्रकाशन करणा-या इंडिया गेम्स या कंपनीचेही संस्थापक होते. २००५ मध्ये त्यांच्या इंडिया गेम्स या कंपनीला रेड हेरिंग या मासिकाने आशिया खंडातील पहिल्या १०० कंपन्यांनमध्ये सूचीबद्ध केले होते. गोंडल यांनी सप्टेंबर २०१२ ते जून २०१३ या काळात वोल्त डिस्ने कंपनी (इंडिया) च्या डिजिटल विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. उद्योजक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक या फेस्टिवल मध्ये मार्गदर्शन करणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button